निवृत्ती वेतन

पुष्पांजली पाटणकर

एकदा घरमालक म्हणाले,

वृद्धापकाळाचे निवृत्ती वेतन चालू करून घ्या.

सांगा त्याला ‘आम्हाला कुणीही नाही.

(जगाच्या दृष्टीने नवरा, मुले, माता, पिता बंधू इत्यादी)

आता ५०० रुपयांचे १ सहस्र रुपये होणार आहेत.

तुम्हाला ना नोकरी ना निवृत्ती वेतन.

क्षणात काय घडले सांगू का ?

एका बाजूला स्वामी (गुरुदेव)

एका बाजूला साक्षात् भगवंत उभे राहिले

म्हणाले, ‘आता सांग, तुला कुणीच नाही ?’

डोळे पाण्याने भरले.

आम्ही काहीही न बोलता जिना चढला.

देवाजवळ हात जोडले.

‘आम्हाला कुणीही नाही’, हा विचार

कधीही मनातही येणार नाही.

कधीही निवृत्ती वेतन घेणार नाही.

।। योगक्षेमं वहाम्यहम् ।।

– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक