देवद (पनवेल) येथील डॉ. दीपक जोशी यांनी सांगितलेली औषधे घेतल्याने आणि प्रतिदिन केवळ २ वेळा जेवल्याने साधिकेचा पित्ताचा त्रास न्यून होणे
मला आठवड्यातून एकदा पित्ताचा त्रास व्हायचा. त्या वेळी मला ‘पुष्कळ डोके दुखणे, अंगाला घाम येणे, थकवा येणे आणि अस्वस्थ वाटणे’, असे त्रास व्हायचे आणि मला झोपावे लागायचे. देवद (पनवेल) येथील डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांवर उपचार करण्यासाठी येतात. एकदा ते आश्रमात आले असतांना मी त्यांच्याकडून औषध घेतले. त्या वेळी त्यांनी मला ‘दिवसभरातून केवळ २ वेळा जेव आणि अन्य वेळी काही खाऊ नकोस’, असे सांगितले.
१. ३ मास औषधोपचार आणि दिवसभरातून केवळ २ वेळा जेवल्यानंतर जाणवलेले पालट
२. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. आवश्यकतेपेक्षा अधिक अन्न ग्रहण केल्याने त्याचा शरिरावर विपरीत परिणाम होतो. आवश्यक तेवढेच अन्न खाल्ल्याने शरीर निरोगी राहून शरिराची कार्यक्षमता वाढते.
आ. पित्ताच्या त्रासामुळे माझ्या मनाची स्थिती बिघडत असे. मी योग्य पद्धतीने अन्न ग्रहण करणे चालू केल्यापासून माझ्या मनाच्या स्थितीतही पालट जाणवत आहे. त्यावरून ‘आपल्या जेवणाची पद्धत सात्त्विक होत गेल्यास त्याचा परिणाम शरिरासह मनावरही होतो’, हे माझ्या लक्षात आले.
– सोनाली बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.२.२०२२)