भोंग्यांविषयीची पुढील भूमिका राज ठाकरे आज मांडणार

मुंबई – आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीयेला कुठेही आरत्या करू नका. मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याविषयी पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या, ३ मे या दिवशी ‘ट्वीट’ द्वारे सांगीन, असे ‘ट्वीट’ राज ठाकरे यांनी २ मे या दिवशी केले.


ठाणे येथील सार्वजनिक सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंगे वाजवल्यास ३ मे या दिवशी मंदिरांमध्ये महाआरती करण्याचे आवाहन केले होते; मात्र पोलिसांवर ताण येऊ नये, यासाठी भोंग्यांविषयीची भूमिका ईदनंतर मांडणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.