अब्दुल सत्तार यांना महसूल राज्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या पदांवरून हटवा !
|
धुळे – जिल्ह्याचे पालकमंत्री असणार्या अब्दुल सत्तार यांचा हनुमानाविषयी अश्लील भाषेत विधाने करणारा व्हिडिओ प्रसारित झाला होता. यातून त्यांची धर्मांध मानसिकता दिसून येते. त्यांच्या विधानांमुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सत्तार हे राज्याचे महसूल राज्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या पदांवर रहाण्याच्या योग्यतेचे नाहीत. सरकारने दोन्ही पदांवरून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यांना धुळे जिल्ह्यात पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दिली. हे निवेदन धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे विभागप्रमुख संजय शर्मा, तसेच सर्वश्री हर्षल गवळी, राहुल क्षीरसागर, प्राणिल मंडलिक, विलास राजपूत, मनोज घोडके, सचिन वैद्य, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे, किशोर अग्रवाल आणि अन्य उपस्थित होते.