हिंसाचाराच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या महिला नेत्याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
गुरुग्राम (हरियाणा) – येथे शहर आवास विकास प्राधिकरणाच्या पथकावर दगडफेक केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि स्थानिक नरगसेविका निशा सिंह यांच्यासह एकूण १० महिलांना न्यायालयाने ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. १५ मे २०१५ या दिवशी ही घटना घडली होती. (घटनेच्या ७ वर्षांनंतर शिक्षा होणे हा न्याय नव्हे, तर अन्यायच होय ! गुन्हेगारांना तातडीने शिक्षा मिळाल्यास देशातील गुन्हेगारी न्यून होईल, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक) या पथकाकडून सेक्टर ४७ मध्ये अतिक्रमण हटवण्यात येत असतांना त्यांच्यावर निशा सिंह आणि अन्य लोकांकडून दगडफेक करण्यात आली. (अतिक्रमण हटवण्यास विरोध करणारे लोकप्रतिनिधी जनताद्रोहीच होत ! – संपादक) निशा सिंह यांनी लोकांना भडकावल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या दगडफेकीमध्ये १५ पोलीस कर्मचारी घायाळ झाले होते.
संपादकीय भूमिकाहिंसाचार करणार्यांवर अशी कारवाई होणे आवश्यक ! |