राखीव श्रेणीतील उमेदवार आता खुल्या श्रेणीतील जागांसाठी दावा करू शकतात ! – सर्वाेच्च न्यायालय
नवी देहली – राखीव श्रेणीशी संबंधित उमेदवार आता खुल्या श्रेणीतील जागांसाठी दावा करू शकतात; मात्र गुणवत्तेमध्ये त्यांची योग्यता आणि स्थिती पहाणे आवश्यक आहे, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिला. हा दावा करण्यासाठी राखीव श्रेणीतील उमेदवारास खुल्या श्रेणीतील उमेदवारापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.