भ्रष्टाचार करणार्यांपैकी काही जणांना कठोर शासन केले, तर भ्रष्टाचार बंद होईल ! घर क्रमांक नसलेल्या घरांना ‘घर क्रमांक’ देण्याची प्रक्रिया राबवतांना सतावणूक होणार नाही, असे आधीच का करत नाही ?
‘घर क्रमांक नसलेल्या घरांना ‘घर क्रमांक’ देण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी सुटसुटीत करण्यात आली आहे, तरीही एखादी पंचायत ‘घर क्रमांक’ देण्यासाठी नागरिकांकडून विनाकारण निरनिराळी कागदपत्रे किंवा पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्याविषयी लेखी तक्रार करावी. सरकार दोषींवर कारवाई करील’, अशी चेतावणी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली आहे.’