४ लहान मुलांचा लैंगिक शोषण करणार्या पाद्य्राला १८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या कोल्लम जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ४ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी थॉमस परिक्कुलम् या पाद्य्राला १८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शोषणाची ही घटना कोल्लम येथील आहे. पाद्री थॉमस एका ख्रिस्ती शिक्षणसंस्थेशी संबंधित असून तो तेथे पाद्री म्हणून कार्यरत होता. पीडित मुले या संस्थेचे विद्यार्थी होते. पाद्री थॉमस याला अटक करण्यात आल्यानंतर तो पोलिसांच्या कह्यातून पळूनही गेला होता. नंतर त्याला चेन्नई येथून अटक करण्यात आली होती.
Kerala: Christian priest sentenced to 18 years for sexually assaulting four teenage boys https://t.co/SIi1nN3SaY
— OpIndia.com (@OpIndia_com) May 1, 2022
संपादकीय भूमिकापाद्य्रांना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी या घटनेविषयी काही बोलतील का ? |