गाठीभेटी ।
दुःखे माझी सोडत नव्हते पाठ ।
देवालाच दया आली म्हणून ।
देवानेच घातली माझी त्याच्याशीच गाठ ।
आणि सांगितले नामजपाचा करा परिपाठ ।। १ ।।
सोडवल्या कृपाळू देवाने ।
जन्मोजन्मीच्या नात्यांच्या गाठी ।
आणि झाल्या केवळ साधक ।
अन् देवाशीच गाठीभेटी ।। २ ।।
या जन्मात भेटला माझा जन्मोजन्मीचा सखा ।
आणि झाला आमचा पाठीराखा ।
परंतु आपल्यात आहेत ‘अहं’च्या गाठी ।
किती आणि कशाच्या अनेक गाठी ।। ३ ।।
जणू आहेत कर्करोगाच्याच गाठी ।
काही कापल्यावर, तर काही काढून टाकल्यावर जातात ।
काही मात्र काढल्या, तरी पुनःपुन्हा येतात ।
काही तर केवळ गुरुकृपेनेच जातात ।। ४ ।।
दयाळू, कृपाळू देव त्यावरही प्रक्रियेचा (टीप) ।
उपाय करून, प्रेमाने घालवायला लावतो ।
आणि काहींचे शस्त्रकर्म करतो ।
अहंच्या जाळ्यातून मुक्त करतो ।। ५ ।।
गुरुकृपाच ती ही अनुभवायला देऊन ।
ओळख देतो करुणानिधी, दयेचा सागर ।
कृपावंत, भगवंत कृपेचा वर्षाव करतो ।
अशा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ।। ६ ।।
टीप : स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |