तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंसाचार्य पुन्हा ताजमहालमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहालमध्ये भगवे वस्त्र नेऊन आणि ब्रह्मदंड घेऊन जाण्यास विरोध केल्यानंतर अयोध्येतील तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंसाचार्य यांनी ५ मे या दिवशी पुन्हा ताजमहालमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. तेथे भगवान शिवाची मूर्ती स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच ‘आगरा येथे धर्मसंसद आयोजित करण्यात येईल आणि त्यात भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात येईल’, असेही त्यांनी म्हटले आहे.
ताजमहल में प्रवेश नहीं दिए जाने के बाद जगद्गुरु परमहंसाचार्य ने फ़िर से तेजो महालय का ज़िक्र किया, लेकिन जगद्गुरु 5 मई को 10 बजे ताजमहल के पश्चिमी गेट पर आकर क्या करेंगें, जानिए इस वीडियो में।#TajMahal pic.twitter.com/RocEBWiLtE
— UP Tak (@UPTakOfficial) April 30, 2022
भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, पीठाधीश्वरांना भगव्या वस्त्रामुळे रोखण्यात आले नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून त्यांना ताजमहालमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.