आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
नवी मुंबई – भाजपचे आमदार गणेश नाईक यांचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा आरोप करत अत्याचार केल्याची आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी नाईक यांनी न्यायालयात धाव घेतली होती.