मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्मा स्मारकास अभिवादन !
मुंबई – महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्म चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या वेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, तसेच खासदार अरविंद सावंत यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.