अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या ‘ई-पेपर’चे लोकार्पण !

३ मे या मंगलदिनी ‘सनातन प्रभात’ समूहाची समस्त हिंदूंना विशेष भेट !

आम्हाला हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचा ‘डिजिटल न्यूजपेपर’ अर्थात् ‘ई-पेपर’ अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी (३ मे या दिवशी) सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या महाराष्ट्र अन् गोवा या राज्यांतील ‘मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ’; ‘पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा’; ‘रत्नागिरी’अन् ‘गोवा आणि सिंधुदुर्ग’ या ४ आवृत्त्या यांच्या प्रत्यक्ष वितरणासमवेतच त्या ‘ई-पेपर’च्या स्वरूपातही आपणा सर्वांना भ्रमणभाष, तसेच संगणक यांच्यावर वाचायला मिळणार आहेत. ‘सनातन प्रभात’चे मराठी आणि कन्नड भाषांतील साप्ताहिक, तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पाक्षिक हेही ‘ई-पेपर’ स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध असेल.

– संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके

  • राष्ट्र-धर्म उत्थानासाठी कृतीशील २४ वर्षांची तपश्‍चर्या !

  • अधिक व्यापक रूपात घडणार चिरंतन दृष्टीकोनांची परंपरा !