आम आदमी पक्ष उत्तरप्रदेशमध्ये रा.स्व. संघाप्रमाणे १० सहस्र शाखा चालू करणार !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भाजप देशात द्वेषाच्या राजकारणाला प्रोत्साहन देत आहे आहे. त्यामुळे देश आणि राज्यघटना दुर्बल होत आहे. जर असेच चालू राहिले, तर भारत त्याचा मूळ चेहरा हरवून बसेल. त्यामुळे भारताला वाचवण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या द्वेषी राजकारणाच्या विरोधात देशातील जनतेला जागृत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रथम संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात आम आदमी पक्ष ‘तिरंगा शाखा’ प्रारंभ करणार आहे. या शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रत्युत्तर म्हणून असतील, अशी माहिती आपचे राज्यसभेतील खासदार आणि उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ‘येत्या ६ मासांत या शाखा चालू करण्यात येतील. १० सहस्र शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. यांमध्ये प्रारंभी राज्यघटनेची प्रस्तावना वाचून दाखवली जाईल’, अशी माहितीही सिंह यांनी या वेळी दिली.
Lucknow: UP in-charge of Aam Aadmi Party and MP Sanjay Singh announced that the party would start setting up ‘tiranga’ (tricolor) branches in the state from July 1 and appoint 10,000 ‘tiranga’ branch heads in the next six months.
— TOI Lucknow News (@TOILucknow) April 30, 2022