ईदनिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना मेचे वेतन एप्रिलमध्येच देण्याचे सरकारचे निर्देश !
ईदनिमित्त ‘इफ्तार पार्ट्या’ देणे, पुढील मासाचे वेतन आगाऊ देणे, असे प्रकार हिंदू अल्पसंख्य असलेल्या पाकिस्तान किंवा बांगलादेश येथे हिंदूंच्या सणांच्या वेळी केले जातात का ?
मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि दिवाळी या मोठ्या सणांच्या निमित्ताने पुढील मासाचे वेतन आदल्या मासात देण्यात येते. या वेळी मात्र ईदच्या निमित्ताने प्रथमच मेचे वेतन एप्रिलच्या वेतनासमवेत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लेखा आणि कोषागार संचालनालयाद्वारे राज्यातील सर्व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना तसे पत्र पाठवले आहे. विधान परिषदेचे माजी सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी केलेल्या विनंतीवरून सरकारने हा निर्णय घेतला. (महाराष्ट्रात हिंदू बहुसंख्य असून गणेशोत्सव आणि दिवाळी हे हिंदूंचे मोठे सण आहेत. या तुलनेत ईद एकच दिवस असते, तसेच मुसलमानांचे सरकारी सेवेतील प्रमाणही तुलनेने अल्प आहे. तरीही पुढील मासाचे वेतन सरकार अशाच प्रकारे आगाऊ देत राहिले, तर भविष्यात प्रत्येक धर्मियांच्या १-२ दिवसांच्या सणांसाठी पुढील मासाचे वेतन आगाऊ देण्याची मागणी झाल्यास आश्चर्य वाटायला नको ! – संपादक)