पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११४ व्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ !

पलूस (जिल्हा सांगली), ३० एप्रिल (वार्ता.) – पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम २२ एप्रिलपासून चालू झाला आहे.  २ ते १० मेपर्यंत पारायण आणि अन्नदान सेवा होणार आहे. प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत भजन होत आहे. ९ मे या दिवशी भव्य रथोत्सव होणार असून १० मे या दिवशी पुण्यतिथी सोहळा होणार आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सेवाधारी व्यवस्थापक श्री. कुमार रायाजी पाटील यांनी केले आहे.