संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेसाठी २५३ भोंगे सिद्ध !

१० सहस्र लिटर पाण्याची मागणी, मुंबईच्या आस्थापनाकडे नियोजनाचे दायित्व !

संभाजीनगर – मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या येथे होणार्‍या सभेला अनुमती मिळताच सिद्धतेने वेग घेतला. ठाकरे यांच्या सभांचे नेहमी काम पहाणार्‍या मुंबई येथील आस्थापनाचे ६ टेम्पो भरून साहित्य आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा २९ एप्रिल या दिवशी सकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आले. मनसेने या सभेला तब्बल ३२ फ्लायिंग स्पीकर साउंड समवेत आणले आहेत. २४ सेटमध्ये तब्बल २५३ ध्वनीक्षेपक असतील.

(सौजन्य : ABP NEWS HINDI)

१५ सहस्र आसंदीची मागणी, २ एल्.ई.डी स्क्रीन लावणार !

३ दिवसांपासून शहराचे तापमान ४२ अंशांपर्यंत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत उष्णतेची धग कायम रहाते. दुपारी ३.३० वाजल्यापासून सभेच्या ठिकाणी गर्दी होणार आहे. त्यामुळे आयोजकांनी प्रत्येकी ५ सहस्र लिटरच्या २ पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे, तर दीड सहस्र पाण्याचे जार मागवले जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली.