महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुसलमान समाजासाठी ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !
एकीकडे मनसेचे प्रमुख राज ठाकरे भोंग्यावरून कणखर भूमिका घेत असतांना सांगली शाखेकडून ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन आश्चर्यकारक आहे !
सांगली, ३० एप्रिल (वार्ता.) – सामाजिक सलोख्याचा संदेश देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विश्रामबाग येथील जिल्हा कार्यालयासमोर ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. मनसे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले. सांगली शहरात पाऊस असतांना अनेक मुसलमानांनी येथे उपस्थिती दर्शवली. (मुसलमान हिंदूंसाठी श्रीरामनवमी, हनुमान जयंती यांच्या निमित्ताने कधी मशिदी, मदरसा येथे अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात का ? सर्वधर्मसमभावाचा पुळका नेहमी हिंदूंचा का ? – संपादक)