इंधन आणि किराणा माल दरवाढीमुळे स्नेहभोजनाच्या दरात ४० टक्के वाढ !
सांगली – इंधन दरवाढीसमवेतच खाद्यतेल, बासमती तांदूळ, भाजीपाला, मजुरी यांचे दर वाढल्याने कार्यालयातील स्नेहभोजनाचे दरही २५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. २ मासांपासून गॅस सिलेंडर, डिझेलसह इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी असलेल्या मंगल कार्यालयात साध्या शिरा-भाताचे जेवण पूर्वी एका ताटासाठी ८० रुपये होते. आता याचाच दर १०० ते १२० रुपये झाला आहे, तर साधा भात, मसाले भात, वांगी-बटाटा भाजी, आमटी, कोशिंबीर यांसह एखादा गोड पदार्थ असलेल्या ताटाचा दर १५० रुपये आहे.