नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !
अमरावती – येथील खासदार नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून त्यांची अपर्कीती केल्याप्रकरणी राजा पेठ पोलीस ठाण्यात २८ एप्रिल या दिवशी तक्रार करण्यात आली होती. तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रपूर आणि इतर ठिकाणी असलेल्या ५ जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. खासदार नवनीत राणा यांचे स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारीनुसार चंद्रपूरकर काटोले, प्रवीण पराड, शेखर तायडे, एक महिला, तसेच नीलेश माटेकर यांनी सामाजिक माध्यमांवर वरील प्रकार केला.