अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ मेपर्यंत वाढ !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडी १३ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. २९ एप्रिल या दिवशी त्यांना सीबीआय विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पांडे यांची कोठडीही १३ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलीसदलातील स्थानांतराच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांची कोठडी वाढवून मागितली आहे. १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते. या आरोपावरूनच त्यांना अटक झाली आहे.