पुणे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात कनिष्ठ लिपिकांच्या नेमणुकीमुळे कामकाज धीम्यागतीने !
पुणे – दुय्यम निबंधक आणि प्रभारी वरिष्ठ लिपिकांनी ‘रेरा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील ४४ अधिकार्यांवर नोंदणी महानिरीक्षकांनी कारवाई केली आहे. काहींचे स्थानांतर, काहींना निलंबित, तर काहींची विभागीय चौकशी चालू आहे.
कारवाईनंतर कार्यालयामध्ये त्यांच्या जागेवर कनिष्ठ लिपिकांची नेमणूक केली आहे. त्यांना कामकाजाची फारशी माहिती नसल्याने कामकाज करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वेळेत दस्त नोंदणी न होणे, तसेच ऑनलाईन भाडेकरार करण्यास विलंब होणे, अशा समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट संघटने’ने केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? संबंधित अधिकारी कामाचा आढावा घेत नाहीत का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाया त्या पदावर योग्य त्या व्यक्तीची नेमणूक न केल्याचा परिणाम ! केवळ माणसाला माणूस ठेवल्यास कार्यालयीन कामकाज कधीतरी समाधानकारक होईल का ? ‘जनतेचा विचार नसलेले अधिकारी काय कामाचे ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? |