श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात पाकीट चोरणारी महिला पोलिसांच्या कह्यात !
कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरासह परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा अपलाभ घेत भाविकांकडील मौल्यवान वस्तू आणि पाकीट चोरणाऱ्या सोलापूर येथील सविता गोविंद अवतळे या महिलेला जुना राजवाडा पोलीस अन् महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी सापळा रचून पकडले. सविता अवतळे हिच्याकडून जप्त केलेल्या पर्समध्ये ७ सहस्र रुपये आढळले. ‘सीसीटीव्ही फुटेज’मध्ये संबंधित महिलेच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्याने पोलिसांनी दर्शन रांगेतून तिला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिकासराईत गुन्हेगार महिला असणे हे दुर्दैवी ! महिलाच मुलांवर चांगले संस्कार करू शकतात. महिलाच गुन्हेगार बनत असतील, तर पुढील पिढी कशी असेल ? नीतीवान समाज निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. |