यवतमाळ जिल्हा परिषदेत अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईची चेतावणी !

यवतमाळ, २९ एप्रिल (वार्ता.) – येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अचानक दिलेल्या कार्यालयीन भेटीत अनेक विभागांमध्ये ३३ कर्मचारी विनाअनुमती अनुपस्थित आढळले. त्या ३३ कर्मचाऱ्यांवर सेवा पुस्तिकेतील नोंदीत यापुढे अनुपस्थित आढळल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणी देण्यात आली. यातील काही कर्मचारी कार्यालयीन कालावधीत पूर्णवेळ चहा टपरीवरच थांबतात. (अशा कर्तव्यचुकार कर्मचाऱ्यांना घरीच बसवायला हवे ! – संपादक)