भारताचे रशियासमवेतचे संबंध गरजेपोटी ! – अमेरिका
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताच्या संदर्भात बोलायचे, तर त्याचे रशियाशी अनेक दशकांपासूनचे जुने संबंध आहेत.ज्या वेळी आम्ही भारताचे भागीदार बनण्याच्या स्थितीत नव्हतो, त्या वेळी भारताने रशियाला गरजेपोटी पसंतीचा भागीदार बनवले, असे उत्तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी खासदार विल्यम हॅगेर्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात संसदेत दिले.
US Secretary of State Antony Blinken (@SecBlinken) has said that India forged its relations with Russia out of necessity, which is not the case with the United States as there is a growing strategic convergence between the two democratic countries.https://t.co/eYyAoP7z0a
— WION (@WIONews) April 28, 2022
ब्लिंकन पुढे म्हणाले की, अतिशय महत्त्वाची ठरण्याची आणि पुढील वाटचाल करण्यातील आधार बनण्याची क्षमता भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारीत आहे.