सौदी अरेबियामध्ये गेलेल्या पाकच्या पंतप्रधानांच्या विरोधात ‘चोर चोर’ अशी घोषणाबाजी !
रियाध (सौदी अरेबिया) – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे ३ दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्यावर गेले आहेत. ते त्यांच्या मंत्रीमंडळासह मदिनाच्या ‘मस्जिद ए नबवी’मध्ये गेले असता तेथे पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी ‘चोर चोर’ अशा घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
On his maiden foreign visit, Pakistan PM Shehbaz Sharif greeted with chants of ‘chor-chor’ (thief) in Saudi Arabia’s Madinah.@CMShehbaz is likely to seek a $7.4-bn aid package from Riyadh.@eriknjoka brings you this report by @AnasMallick
LIVE TV: https://t.co/iSR65rMKwj pic.twitter.com/gRz3G5TL3I
— WION (@WIONews) April 29, 2022
पाकच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी पंतप्रधान शाहबाज यांच्याविरोधातील घोषणाबाजीसाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना उत्तरदायी ठरवले आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर शाहबाज यांचा हा पहिलाच दौरा आहे. या दौर्यात ते सौदी अरेबियाकडे अडीच सहस्र कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
संपादकीय भूमिकामुसलमानांसाठी पवित्र असलेल्या देशात इस्लामी देश असणार्या पाकच्या पंतप्रधानांची लायकी काय आहे, हे स्पष्ट होते ! भारतातील पाकप्रेमींनी याचा विचार करावा ! |