पतियाळा (पंजाब) येथील ‘गुरु की सराय’ या शिखांच्या धार्मिक स्थळाला मशीद बनवल्याचे मत !
पतियाळा (पंजाब) – येथील गुजरानवाला भागातील ‘गुरु की सराय’ या धार्मिक स्थळाचे मशिदीमध्ये रूपांतर करण्यात आल्याचा आरोप हिंदूंकडून करण्यात आला आहे, तर मुसलमानांचे म्हणणे आहे की, ७५ वर्षांपूर्वीही येथे मशीद होती आणि आता केवळ तिला नवीन स्वरूप देण्यात आले आहे.
Punjab: Guru ki Sarai allegedly converted to mosque by intimidating a Sikh family in Patiala, situation tense as Hindu organisations protesthttps://t.co/y6TTRLYX7j
— OpIndia.com (@OpIndia_com) April 28, 2022
१. हिंदूंचे म्हणणे आहे की, फाळणीपूर्वी येथे शीख कुटुंब रहात होते आणि ते या स्थानाची देखभाल करत होते. त्या कुटुंबाला मुसलमानांनी धमकावून हाकलून लावले आणि ही जागा स्वतःच्या नियंत्रणात घेतली. काही कालावधीनंतर तिथे मशीद बांधली. पूर्वी तेथे शिखांचे पवित्र चिन्ह होते, ते हटवून इस्लामी चिन्ह लावण्यात आले आहे.
२. हा वाद न्यायालयातही गेला होता. वर्ष २०१७ मध्ये मुसलमान हे सिद्ध करू शकले नव्हते की, हे स्थान त्यांचे आहे. न्यायालयाने त्यानंतर शिखांच्या बाजूने निकाल दिला होता. तरीही तेथे आता नमाजपठण होत असते. (न्यायालयाने आदेश देऊनही कायद्याचे पालन न करणार्यांवर प्रशासन काय कारवाई करणार ? – संपादक)
३. याविषयी गुजरानवाला मशिदीचे अध्यक्ष अतर हुसैन यांनी सांगितले की, या संदर्भातील आमची कागदपत्रे उपविभागीय अधिकार्यांकडे सोपवण्यात आली आहेत.
४. या संदर्भात उपविभागीय अधिकार्यांनी ९ मे या दिवशी दोन्ही पक्षांना कागदपत्रांसह चर्चेसाठी बोलावले आहे.