नाशिक येथे आमदार अमोल मिटकरी यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आंदोलन !

नाशिक – येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. येथील ब्राह्मण समाजातील शेकडो कार्यकर्ते २७ एप्रिल या दिवशी रस्त्यावर उतरले. भाजप आणि मनसे यांचे नेतेही आंदोलनस्थळी आले होते. अनेक विद्यार्थ्यांनीही पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभाग घेतला. कार्यकर्ते भगव्या टोप्या, कपाळी गंध आणि सदऱ्यावर निषेधाची काळी पट्टी लावून सहभागी झाले होते. या वेळी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल आणि मोठ्या संख्येने धर्माभिमानी उपस्थित होते.