मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. यामुळे येथील भारतियांनी याची तक्रार पोलिसांकडे, तसेच प्रशासनाकडे केली आहे.

१. याविषयी स्थानिक निवासी आनंद पाल यांनी सांगितले की, खलिस्तानी आतंकवाद्यांनी पंजाबमध्ये माझ्या२ काकांची हत्या केली होती. त्यामुळे भिंद्रनवाले याचे छायाचित्र पाहून मला पुष्कळ वाईट वाटले.

२. अन्य एका व्यक्तीने सांगितले की, मेलबर्नमध्ये खलिस्तान समर्थकांची मोठ्या संख्येने उपाहारगृहे आणि दुकाने आहेत. येथे येणार्‍या लोकांच्या चारचाकी गाड्यांवर ‘आय लव्ह भिंद्रनवाले’ ‘खलिस्तान झिंदाबाद’ अशा आशयाचे स्टिकर लावलेले असतात.

संपादकीय भूमिका

  • याविषयी भारत सरकारने ऑस्ट्रेलियाच्या सरकारला सांगून खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा उदोउदो करणार्‍यांवर कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !
  • जिहादी आतंकवादाचा वेळीच निःपात न केल्यामुळे तो डोईजड झाला. खलिस्तानी आतंकवादाच्या संदर्भातही तसे होऊ नये; म्हणून सरकारने आतापासून पावले उचलणे आवश्यक !