गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’ची सक्ती होण्याची शक्यता ! – आरोग्यमंत्री

मुंबई – राज्यात तशी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. नवे विषाणू ‘ओमायक्रॉन’चाच भाग आहेत. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही; मात्र आवश्यकता भासल्यास गर्दीच्या ठिकाणी ‘मास्क’ची सक्ती होऊ शकते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ एप्रिल या दिवशी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोनाविषयी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांना वरील माहिती दिली.

राजेश टोपे

या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘राज्यात नियमित कोरोनाच्या २५ सहस्र चाचण्या होत आहेत. राज्यात एकूण ९२९ कोरोनाचे रुग्ण आहेत. पंतप्रधानांसमवेत झालेल्या बैठकीत लसीकरणात वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ६ ते १२ या वयोगटासाठी लसीकरण करण्यास केंद्रशासनाने अनुमती दिली आहे.