मौल्यवान एक रत्न झाले संतपदी विराजमान ।
नाव असे तुमचे रत्नमाला ।
रत्नागिरीतील राजापुरात जन्म झाला ।। १ ।।
देवाने शोधून काढले अशा ठिकाणाहून तुम्हाला ।
देवद आश्रमातील देवाजवळ असे वास्तव्याला ।। २ ।।
रत्नांच्या माळेतूनी एक रत्न काढले निवडून ।
सेवा दिली तुम्हाला, रत्न काढ बघू पारखून ।। ३ ।।
मन गुरुचरणी समर्पित होऊन ।
तन-मन अर्पून सेवा केली झोकून ।। ४ ।।
आश्रमातील आनंदमयी वातावरण पाहून ।
सख्या सोबतच्या माणिक-मोत्यांना पडे प्रश्न ।। ५ ।।
आवडले गुरुदेवांना अनेक गुण असणारे हे रत्न ।
घोषित केले पू. अश्विनीताईंनी (टीप) घालून गळ्यात माळ ।। ६ ।।
असतील अनेक साक्षीदार त्या आनंदमयी क्षणांचे ।
मौल्यवान एक रत्न झाले संतपदी विराजमान ।। ७ ।।
असे संत दिल्याबद्दल करते गुरुस्मरण ।
धरते गुरुचरण अन् करते गुरूंना पदोपदी नमन ।। ८ ।।
टीप – सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०२२)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक