महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार श्री हनुमानाविषयी अश्लाघ्य वक्तव्य करत असलेला व्हिडिओ प्रसारित !

महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, २७ एप्रिल (वार्ता.) – शिवसेनेच्या तिकिटावर संभाजीनगर येथून निवडून आलेले आणि सध्या महसूल अन् ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांचा  एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. यामध्ये त्यांनी हिंदूंची शक्तीची देवता हनुमानाविषयी अतिशय खालच्या स्तराचे अश्लाघ्य वक्तव्य करत अश्लील शिव्या दिल्या आहेत. सत्तार यांच्या या व्हिडिओवरून सामाजिक माध्यमांवर हिंदूंकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून सत्तार यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात येत आहे. (हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करणाऱ्या धर्मांध अब्दुल सत्तार यांची राज्यमंत्रीपदावरून हकालपट्टी करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशीच हिंदूंची मागणी आहे ! – संपादक)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

१. या ‘व्हिडिओ’ची सत्यता जाणून घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना दूरभाषवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी दूरभाष उचलला नाही. याविषयी अब्दुल सत्तार यांचे खासगी सचिव शकील शेख यांच्याशी संपर्क झाला. शकील शेख यांनी सांगितले, ‘‘हा व्हिडिओ २-३ वर्षांपूर्वीचा असून अब्दुल सत्तार तेव्हा राज्यमंत्री पदावर नव्हते.’’ सत्तार हे त्यांच्या शेतातील काही व्यक्तींना शिवीगाळ करत बाहेर काढत आहेत, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

२. शिवसेनेत येण्यापूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार असल्याचे कळल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. (यावरून अब्दुल सत्तार हे शिवसेनेशी नव्हे, तर सत्तेशी एकनिष्ठ असल्याचेच दिसून येते. हिंदूंच्या भावनांचा अनादर करणाऱ्या नेत्याची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)

अब्दुल सत्तार यांना कारागृहात टाकण्याचे आमदार नीतेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन !

या प्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी अब्दुल सत्तार यांच्या धर्मांध वक्तव्याचा व्हिडिओ स्वत:च्या ‘ट्विटर’वरून प्रसारित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अब्दुल सत्तार यांना कारागृहात टाकण्याचे आवाहन केले आहे.

संपादकीय भूमिका

  • एका राज्याचे मंत्री बहुसंख्य हिंदूंच्या आराध्य दैवताविषयी अश्लाघ्य वक्तव्ये करतात, हे संतापजनक होय ! धर्मनिरपेक्षतेचा सल्ला देणाऱ्यांना आणि सौहार्दतेच्या गप्पा मारणाऱ्यांना राज्यमंत्रीपदावरील या वक्तीच्या धर्मांध वक्तव्यांविषयी काय म्हणायचे आहे ?
  • धर्मांध अब्दुल सत्तार यांना अटक करावी, तसेच त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने आंदोलन करावे !