‘जेवढ्या मोठ्या आवाजात अजान दिली जाईल, तेवढ्याच आवाजात हनुमान चालिसा म्हटली जाईल ! – हिंदवी स्वराज संघटना
भोपाळ (मध्यप्रदेश) – जेवढ्या मोठ्या आवाजात अजानचा आवाज येईल, तेवढ्या मोठ्या आवाजात हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, अशी चेतावणी ‘हिंदवी स्वराज’ या संघटनेने दिली आहे. इंदूरच्या संवेदनशील चंद्रभागा परिसरात हनुमान चालिसा आणि अजान एकत्र ऐकू येत आहेत. हिंदवी स्वराज संघटनेशी संबंधित अधिवक्ता अमित पांडे म्हणाले, ‘‘हनुमान चालिसा म्हणण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक मंदिर आणि हिंदूंची घरे यांमधून ही मोहीम पुढे नेली जाईल.’’
१. खारगोनजवळील उबदी गावातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात हिंदु महिला ‘विशिष्ट समाजातील लोकांच्या दुकानातून वस्तू खरेदी करणार नाहीत’ अशी शपथ घेत आहेत. गर्दीत लहान मुलीही आहेत. ‘या व्हिडिओचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करू’, असे उपविभागीय अधिकारी मिलिंद ढोके यांनी सांगितले.
२. खारगोन दंगलीच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी विशिष्ट वर्गाच्या दुकानांतून वस्तू खरेदी करू नयेत, असे आवाहन हिंदु समाजाला करण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत, असे खारगोन पोलीस अधीक्षक रोहित कासवानी यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाआता निधर्मीवादी ‘हिंदवी स्वराज’ संघटनेला ‘धर्मांध’ म्हणून हिणवतील; मात्र ‘अशी घोषणा करण्याची वेळ या संघटनेवर का आली ?’, याचा विचार करण्याचे कष्ट कुणी घेणार नाहीत ! |