परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवामध्ये म्हटलेली भजने आणि साधिकेने भजनावर सादर केलेले नृत्य पाहून एका साधिकेला आलेली अनुभूती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवामध्ये म्हटलेली भजने आणि साधिकेने भजनावर सादर केलेले नृत्य पाहून ‘ही भजने वर्षभरापासून स्वतः परात्पर गुरु डॉक्टरांना आळवण्यासाठी म्हणत आहे’, असे लक्षात येणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी साधिकेची इच्छा पूर्ण केल्याने तिची भावजागृती होणे
२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ भावसत्संग झाला. त्यात यापूर्वी झालेल्या जन्मोत्सवाच्या ध्वनीचित्र-चकत्या दाखवण्यात आल्या. त्यात काही साधकांनी भजने म्हटली, तर एका साधिकेने भजनावर नृत्य सादर केले. मला ते पहातांना आश्चर्य वाटले; कारण गेले वर्षभर मी त्याच भजनांकडे आकर्षित होत होते. त्या वेळी ‘ती भजने मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी म्हणत आहे अन् नृत्य करत त्यांना आळवत आहे’, असा भाव मी ठेवत होते. त्यामुळे तो कार्यक्रम पहातांना ‘भजन म्हणणारे अन् नृत्य करणारे ते साधक इतर सर्व साधकांचे प्रतिनिधित्व करत असून परात्पर गुरु डॉक्टरांनी माझी इच्छा पूर्ण केली’, असे मला वाटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या साधकानेही त्याचप्रमाणे सांगितल्यामुळे त्याला पुष्टी मिळाली. ‘विविध माध्यमांतून देव सतत माझ्या समवेत असतो’, याची जाणीव होऊन माझी भावजागृती झाली. तेव्हा मी निर्विचार स्थिती अनुभवली. मला वेळेचे आणि स्वतःचे भान राहिले नाही.
परात्पर गुरुदेवांनी त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त एवढी अमूल्य भेट दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
– सौ. रिशिता गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |