हिंदूंच्या मिरवणुकांवरील धर्मांधांची आक्रमणे कधी थांबणार ?
कोरोनाचे संक्रमण थांबल्याने २ वर्षांनंतर प्रथेनुसार हिंदूंनी रामनवमी साजरी करण्यासाठी शोभायात्रा काढल्या; पण या शोभायात्रांवर महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा या राज्यांमध्ये धर्मांधांकडून दगडफेक आणि शस्त्रांस्त्रांसह आक्रमणे झाली. यात गुजरातमध्ये एका हिंदूचा मृत्यू झाला, तर अनेक पोलीस अधिकारी आणि भाविक घायाळ झाले. धर्मांधांनी हिंदूंची वाहने, आस्थापने, दुकाने आणि घरे यांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे केली.
१. गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या भाजपशासित राज्यांमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांची आक्रमणे होणे
१ अ. गुजरात
१ अ १. गुजरात येथील दगडफेकीत भाविक आणि पोलीस यांना लक्ष्य केले जाणे : भाजपशासित राज्यांमध्ये हिंदूंवर आक्रमणे, हे आता ऐकायलाही बरे वाटत नाही; पण दुर्दैवाने ते चालूच आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या भाजपशासित ३ राज्यांमध्ये धर्मांधांनी शोभायात्रांवर आक्रमणे केली. सर्वप्रथम गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील हिंमतनगरच्या शबरी या भागात श्रीरामनवमीची मिरवणूक निघाली असतांना अचानक दगडफेक झाली. यात भाविक आणि पोलीस यांना लक्ष्य करण्यात आले, तसेच त्यांच्या वाहनांचीही मोठी हानी केली.
१ अ २. एका हिंदु मुलाचा मृत्यू होणे : गुजरातच्या आनंद जिल्ह्याच्या खंबातमधील शकरपूरमध्ये मिरवणूक निघाल्यावर धर्मांधांनी तेथील घरे, वाहने आणि दुकाने यांची जाळपोळ केली. या हिंसाचारात एका हिंदु मुलाचा मृत्यू झाला, तर काही पोलीस अधिकारी घायाळ झाले. धर्मांधांनी केलेल्या या हिंसाचाराचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले नाही. (धर्मद्वेष्ट्या वृत्तवाहिन्या ! – संपादक)
१ आ. गुलबर्गा (कर्नाटक) येथेही श्रीरामनवमी शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली.
१ इ. मध्यप्रदेश
१ इ १. धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड आणि मूर्तींची विटंबना करणे : मध्यप्रदेशात तर भयंकरच घडले. खरगोन, बडवानी येथे धर्मांधांनी प्रचंड हिंसाचार केला. त्यांनी हिंदूंची ३ मंदिरेही पाडली. बडवानी जिल्ह्यातील सेनगाव येथे धर्मांधांनी श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह २० भाविक घायाळ झाले. या वेळी धर्मांधांनी ३ मंदिरांमध्ये जाऊन तोडफोड आणि मूर्तींची विटंबना केली.
१ इ २. मिरवणुकीवर केलेल्या पेट्रोल बाँबच्या आक्रमणात पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि ४ हिंदू घायाळ होणे अन् प्रशासनाने ७० हून अधिक धर्मांधांना अटक करून दंगलीत भाग घेणाऱ्या धर्मांधांची घरे, तसेच दुकाने बुलडोझरच्या साहाय्याने पाडणे : खरगोन येथे मुसलमानबहुल भागात धर्मांधांनी मिरवणुकीवर पेट्रोल बाँबने आक्रमण केले. यात पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि ४ हिंदू घायाळ झाले. शहरात तणावपूर्ण परिस्थिती झाल्यानंतर गोशाळा मार्ग आणि मोतीपुरा भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. याविषयी बोलतांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, ‘‘या वेळी हिंसाचार करणाऱ्यांना केवळ अटक करून कारागृहात ठेवले जाणार नाही, तर त्यांच्याकडून सार्वजनिक आणि खासगी संपत्तीची हानी भरून घेतली जाईल.’’ त्याप्रमाणे प्रशासनाने त्वरित कारवाई करून ७० हून अधिक धर्मांधांना अटक केली, तसेच बुलडोझरने दंगलीत भाग घेणाऱ्या धर्मांधांची घरे आणि दुकाने पाडली.
२. बंगाल, झारखंड, ओडिशा राज्यांमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांची आक्रमणे आणि हिंसाचार !
२ अ. बंगाल
२ अ १. केंद्रीय राज्यमंत्री सहभागी असणाऱ्या मिरवणुकीवरही धर्मांधांनी दगडफेक करणे : बंगालमध्ये हावडा जिल्ह्यात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांनी आक्रमण केले. तसेच पोलिसांनीही हिंदूंवर लाठीमार केला. बंगालमधील बांकुरा येथे स्वत: केंद्रीय राज्यमंत्री सुभाष सरकार सहभागी झालेल्या मिरवणुकीवर मशिदीवरून दगडफेक करण्यात आली; पण पोलिसांनी हिंदूंवरच लाठीमार केला. बंगाल काश्मीरच्या वाटेवर आहे. तेथे ३५ वर्षे साम्यवादी आणि गेली १२-१३ वर्षे तृणमूल काँग्रेसचे राज्य आहे.
२ आ. झारखंड : झारखंडमधील लोहरदगाच्या हिरही-हेंदलासो कुजरा या गावाच्या सीमेवर श्रीरामनवमीच्या निमित्ताने चालू असलेल्या कार्यक्रमात हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. यात १० दुचाकी आणि एक पिकअप व्हॅन (मालवाहू वाहन) जाळण्यात आली.
३. महाराष्ट्रात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांची आक्रमणे
३ अ. मानखुर्द (मुंबई) येथे धर्मांधांनी आक्रमण करूनही पोलिसांनी हिंदूंच्या संदर्भात दुजाभाव करणे : महाराष्ट्रात श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत हिंदूंनी ध्वनीक्षेपकावर भजने लावली होती. तीही पोलिसांनी बंद केली. मानखुर्द (मुंबई) येथे धर्मांधांनी मिरवणुकीवर तलवारी आणि काठ्या यांनी आक्रमण केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात रिक्शातून तलवारींसह घटनास्थळी येऊन धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. या धर्मांधांच्या विरोधात तक्रार देण्यास गेलेल्या हिंदूंना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले; पण गुन्हा नोंदवून घेतला नाही.
३ आ. सप्तशृंगीदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांशी धर्मांधांनी वाद घालणे आणि पोलिसांनी भाविकांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यास नकार देणे : चैत्र गौरीचे नवरात्र चालू होते. त्यामुळे परंपरेनुसार भाविक खानदेशातून भक्तीगीते ऐकत वणीच्या सप्तशृंगीदेवीच्या दर्शनाला पायी जात होते. ही दिंडी मालेगाव येथे आल्यावर धर्मांधांनी भक्तांना अडवले आणि गीते बंद करण्यास सांगितले. त्यांच्याशी वाद घातला, तसेच त्यांच्यावर दगडफेक केली. हे भक्त तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेले; पण त्यांची तक्रार प्रविष्ट करून घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील कृषीमंत्री आणि शिवसेना नेते दादा भुसे यांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार प्रविष्ट करण्याविषयी सांगावे लागले.
४. धर्मांधांचे हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर आक्रमण
धर्मांधांनी हनुमान जयंतीला आंध्रप्रदेश, देहली आणि उत्तराखंड या ३ राज्यांमध्ये आक्रमणे केली. ‘देहलीतील जहांगीरपुरी येथील आक्रमणात बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग होता’, असे म्हटले जाते. या आक्रमणात अनेक भाविक आणि ८ पोलीस घायाळ झाले. आंध्रातील कुर्नुल येथे मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यात १५ जण घायाळ झाले. या प्रकरणी २० जणांना अटक झाली. उत्तराखंडमधील डाडा जलालपूर येथेही हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. त्यात १० भाविक घायाळ झाले. २ वाहनांना आग लावण्यात आली. हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हनुमान मंदिराची तोडफोड करण्यात आली. या आक्रमणात १२ पोलीस अधिकारी घायाळ झाले. महाराष्ट्रातील नगर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त रात्री ११ वाजता तख्ती दरवाजा, तेलीखुंट येथे दगडफेक करण्यात आली. यात १३ धर्मांधांना अटक झाली. हे सर्व घडत असतांना निधर्मीवादी तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेले होते.
५. धर्मांधांचे लांगूलचालन करणाऱ्या प्रसारमाध्यमांची धर्मद्रोही आणि भेकड भूमिका
नेहमीप्रमाणे याही वेळेस हिंदूंवरील आक्रमणाच्या पुसटशा बातम्याही ‘इलेक्ट्रॉनिक’ माध्यमांमध्ये दाखवण्यात आल्या नाहीत. जेव्हा अन्यायाच्या विरोधात हिंदू रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांच्या विरोधात दिवसभर बातम्या दाखवल्या जातात. मराठी आणि हिंदी वृत्तवाहिन्यांवर हिंदू आक्रमक झाल्याच्या खोट्या चित्रफीती दाखवण्यात आल्या. प्रतिदिन अनेक गुन्ह्यांमध्ये धर्मांधांना अटक होते; पण वृत्तवाहिन्या यात लहान बातमी देण्यासह त्यातही शक्यतो आरोपींचे नाव प्रसिद्ध करायचे टाळतात. धर्मांधांना आदरयुक्त महत्त्व दिले जाते, तर हिंदूंच्या संतांचाही एकेरी उल्लेख केला जातो.
ज्या कारणांमुळे हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागते, त्यामागची कारणे एकदाही वृत्तवाहिन्या देत नाहीत. प्रत्येक वेळी गुजरात दंगल किंवा मुंबईला बाळासाहेब ठाकरे असतांना धर्मांधांवरील कथित आक्रमणांचे संदर्भ सांगितले जातात; पण त्याच्या मागील पार्श्वभूमी कधीच बघितली जात नाही. गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये रेल्वे डब्यातील निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. त्यात ५२ कारसेवकांचा कोळसा झाला. त्याची प्रतिक्रिया हिंदूंच्या उद्रेकातून उमटली. त्यात काही धर्मांधांचा मृत्यू झाला; पण आज त्याचाच जगभर डांगोरा पिटला जातो.
६. धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्यावर हिंदूंवरच कारवाई करणारे बोटचेपे पोलीस !
भारतभरात संधी मिळताच धर्मांध पोलिसांना मारतात. आझाद मैदानातील रझा अकादमीच्या मोर्च्यात तर धर्मांधांनी हिंदु महिला पोलिसांची विटंबना केली. ज्या पोलिसाने व्यथित होऊन सरकारच्या भूमिकेविषयी कविता केली होती, त्याला काय यातना भोगाव्या लागल्या? हे सर्वश्रुत आहे. भिवंडीत धर्मांधांनी २ पोलिसांना जिवंत जाळले होते. असे असतांनाही पोलीस कधीही हिंदूंना साहाय्य करत नाहीत. हिंदूंवरील आक्रमणे, जाळपोळ, महिलांची विटंबना, गोमातेच्या हत्या असे अनेक गुन्हे केल्यावरही त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस हिंदूंवर मर्दुमकी दाखवतात. मिरवणुकीत हिंदूंनी मार खाल्ल्यावरही धर्मांधांसह हिंदूंवरही कारवाई करून समसमान अटक दाखवली जाते. त्यांच्याकडून धर्मांधांना ‘इफ्तार मेजवानी’ दिली जाते. (जे काही काळ बंद होते; पण परत चालू झाले आहे.) हिंदूंचे सणवार आले की, उत्सव साजरे करण्यासाठी पोलिसांची अनुमती मागावी लागते. त्यासाठी पोलीस अनेक चकरा मारायला लावतात, अनेक बंधने घालतात आणि अगदी शेवटच्या दिवशी अनुमती देतात.
७. धर्मांधांनी हिंदूंच्या प्रत्येक सणाच्या वेळी हिंदूंवर आक्रमण करणे आणि पोलिसांकडून मात्र हिंदूंनाच गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जाणे
हिंदूंच्या नववर्षानिमित्ताने अलीकडे गुढीपाडव्याला मिरवणुका निघतात. त्यावरही धर्मांधांची आक्रमणे ठरलेलीच आहेत. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये नुकतेच गुढीपाडव्याला हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. भाद्रपद मासात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकींवरही धर्मांधांची आक्रमणे होतात. त्यानंतर येणाऱ्या दुर्गाेत्सवाच्या वेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवरही अनेक ठिकाणी आक्रमणे होतात. संक्रांतीला पतंग उडवतांना मांजामुळे इजा झाली; म्हणून दंगली होतात. होळीला अंगावर रंग पडला; म्हणूनही हिंदूंवर आक्रमण होतात. एकूणच काय, तर आजपर्यंत सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांनी त्यांना डोक्यावर बसवून ठेवल्याचाच हा परिणाम आहे. हिंदूंचे अनेक नेते असूनही हिंदू एकटे पडतात. त्यांना पोलिसांकडून गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जाते. हे आता तरी पालटायला पाहिजे.
८. हिंदूंच्या सहिष्णु वृत्तीमुळे धर्मांधांचे प्रत्येक कार्यक्रम सुरळीत पार पडणे
आजपर्यंत भारतात धर्मांधांच्या मोहरम, इस्तेमा, मरकज, ईद, शब्बे बारात, उरूस या कार्यक्रमांवर आक्रमण झाल्याचे कधी बघायला मिळाले का ? कारण हिंदू त्यांच्यासारखे आक्रमक कधीच नसतात. याउलट हिंदू मार खातात आणि हिंदूंचीच दुकाने, घरे अन् वाहने यांची धर्मांधांकडून सतत राखरांगोळी केली जाते.
९. हिंदूंनी अत्याचार सहन करत बसण्यापेक्षा संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !
अलीकडे भाजपशासित राज्यांमध्ये धर्मांधांच्या विरुद्ध काही प्रमाणात कारवाई केली जाते. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. अनेक राज्यांत धर्मांधांनी धुडगूस घातला; पण उत्तरप्रदेशात रामनवमीचे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडले. देहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठामध्ये यावर्षी श्रीरामनवमीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याला साम्यवाद्यांनी तीव्र विरोध केला. यात ६० जण घायाळ झाले. पोलीस आणि प्रशासन हिंदूंना कवडीचीही किंमत देत नाहीत. हे सर्व थांबवण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श ठेवला पाहिजे. पूर्वी भिवंडीसह अन्य ठिकाणी शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यास धर्मांध विरोध करायचे; पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रयत्नपूर्वक भिवंडी, तसेच अन्य ठिकाणी शिवजयंतीची मिरवणूक काढायला प्रारंभ केला. हिंदूंनी आपल्या धार्मिक उत्सव आणि परंपरा यांसाठी एकत्रित आले पाहिजे. त्यामागील हिंदूसंघटनाचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. हिंदूंनी प्रतिदिन त्यांच्यावरील अत्याचार सांगत बसण्यापेक्षा हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी योग्य प्रकारे व्यष्टी साधना केली पाहिजे. त्यामुळे हिंदु राष्ट्र लवकर येणे शक्य होईल.
विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ हा हिंदी चित्रपट काढला; पण यातील वास्तव स्वीकारायला निधर्मीवादी सिद्ध नाहीत. ‘हा भूतकाळ होता’, असे ते मानतात. देहलीच्या दंगलीविषयी अग्निहोत्री म्हणतात, ‘ज्यांना काश्मीर भूतकाळ वाटतो, त्यांनी देहली दंगलीच्या चित्रफीती पहाव्यात, म्हणजे त्यांना कळेल की, धर्मांधांनी बंदुका आणि आणि तलवारी घेऊन हिंदू, तसेच पोलीस यांच्यावर कशी आक्रमणे केली. अग्निहोत्री यांच्या मते ‘दर्ग्यावर चादर चढवणे, ही ‘फॅशन’ झाली आहे’. ही आक्रमणे त्याचाच परिणाम आहेत.
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (१५.४.२०२२)