उत्तरप्रदेश सरकारचे यश !
उत्तरप्रदेशात १७ सहस्र धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून झाला, हे वृत्त हिंदूंना अचंबित करणारे आणि समाधान देणारे आहे. सध्या मशिदींवरून देण्यात येणाऱ्या अजानमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे होणारा त्रास या सूत्रावरून राळ उठली आहे. गेली कित्येक दशके या सूत्राला विरोध होत आहे. पूर्वी दबक्या आवाजात विरोध केला जात असे; मात्र मागील काही वर्षांत राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हे उघडपणे याला विरोध करतांना दिसत आहेत. आताही मशिदींवरील भोंग्यांचा आवाज न्यून झाला नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचे सूत्र हिंदूंनी उचलून धरले आहे. त्याला धर्मांधांकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील हे वृत्त चिंतन करायला लावणारे आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काही कठोर पावले उचलली. मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी धर्मांधांनी घडवून आणलेल्या दंगली नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. धर्मांधांच्या हिंदुविरोधी कारवाया रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदाही केला. यावर्षी श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवांच्या वेळी साधारण ८ राज्यांमध्ये हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याच्या घटना समोर आल्या; मात्र उत्तरप्रदेशमध्ये असे काही घडले नाही. योगी आदित्यनाथ यांच्या भाषेत सांगायचे, तर ‘दंगल घडली नाहीच; पण त्याहून अधिक हिंदु आणि मुसलमान समाजामध्ये ‘तू तू-मी मी’ असेही काही घडले नाही.’ ‘तेथील पोलीस आणि प्रशासन यांनी धर्मांधांवर वचक बसवला आहे’, असे म्हणण्यास वाव आहे. यावरून जे उत्तरप्रदेश सरकारला शक्य आहे, ते अन्य राज्य सरकारांना का शक्य नाही ? आतापर्यंत उत्तरप्रदेशातील १२५ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. त्याही पुढे जाऊन मोठा आवाज असणाऱ्या भोंग्यांविषयी अहवाल मागवला आहे. ‘जी धार्मिक स्थळे सूचना देऊन भोंग्यांचा आवाज न्यून करणार नसतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असे एकप्रकारे सूचित केले आहे. प्रशासन आणि पोलीस यांनी कर्तव्यनिष्ठपणे कार्य करून कायद्याचे राज्य आणले, तर धर्मांधांवर वचक बसतोच. यासाठी प्रथम प्रशासन आणि पोलीस यांच्यात शिस्त आणणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेश सरकारला हे जमले. ‘कायदा आणि नियम यांचे पालन केले नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील’, याची जाणीव धर्मांधांना झाली आहे. त्यामुळे ते विरोध करून किंवा आक्रमक होण्याऐवजी दिलेल्या सूचनांचे पालन करत आहेत. आक्रमक धर्मांधांना चुचकारून किंवा त्यांच्यासमोर मान तुकवून ते सुधारत नाहीत, तर त्यांच्या विरोधात तितक्याच आक्रमकपणे कायदा आणि नियम यांची कार्यवाही करून त्यांना वठणीवर आणता येते. हे उत्तरप्रदेश सरकारला जमल्यामुळे भोंग्यांमुळे भारतभरातील वातावरण ढवळून गेले असता उत्तरप्रदेशमध्ये मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. हिंदूंसाठी मात्र हे सुखावह चित्र आहे.
धर्मांधांवर वचक निर्माण करणार्या उत्तरप्रदेश सरकारकडून अन्य सरकारांनी बोध घ्यावा ! |