उत्तरप्रदेशातील ७ सहस्र ४४२ मदरशांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणाच्या योजनेत सहभागी असणार्‍या ७ सहस्र ४४२ मदरशांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे.

१५ मेपर्यंत समितीला तिचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही समिती मदरशांच्या सध्याच्या स्थितीचे निरीक्षण करणार आहे. तसेच त्यांच्या कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.