चांदिवाल आयोगाचा अहवाल गृहमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द !
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याच्या अन्वेषणासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चांदिवाल आयोगाचा अहवाल २६ एप्रिल या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अहवालामध्ये अनिल देशमुख यांच्यावरील आरोप फेटाळण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले; मात्र सरकारकडून याविषयीची अधिकृत भूमिका अद्यापही घोषित करण्यात आलेली नाही. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपावरून अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र द्यावे लागले होते.