राजस्थानच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीला हिंदुविरोधी दंगलीतील धर्मांध आरोपी उपस्थित !
जयपूर (राजस्थान) – येथे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी २३ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील बारां जिल्ह्यातील छबडा येथे ११ एप्रिल २०२१ या दिवशी धर्मांधांनी केलेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी आसिफ असाढी हाही सहभागी झाला होता. या वेळी त्याने काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांच्यासमवेत छायाचित्रेही काढली.
१. याविषयी छबडा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रतापसिंह सिंघवी यांनी म्हटले की, दंगलीतील आरोपी मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीला उपस्थित रहातो, हा चिंतेचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रवेश कसा देण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे.
२. याविषयी विशेष पोलीस अधीक्षक मीणा यांनी याविषयी सांगितले की, आम्हाला इफ्तारसाठी येणाऱ्यांची सूची देण्यात आली नव्हती. आसिफ हा छबडा दंगलीतील आरोपी असला, तरी तो जामिनावर सुटला आहे. त्याला कुणी आमंत्रित केले, हे आम्हाला ठाऊक नाही.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने आतापर्यंत जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांना डोक्यावर बसवून हिंदूंना पायदळी तुडवण्याचाच प्रयत्न केला आहे, तेच या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे. अशा काँग्रेसला देशातून राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य ! |