भंडारा येथे विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गोळ्या बुरशीयुक्त !

विद्यार्थ्यांना दिलेल्या जंतनाशक गोळ्या

भंडारा – जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने ‘राष्ट्रीय जंतनाशक दिना’निमित्त १ ते १९ वयोगटांतील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम २५ एप्रिलपासून चालू करण्यात आली. भंडारा तालुक्यातील खरबी येथील विकास हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ११ वाजता जंतनाशक गोळ्यांचे वितरण चालू केले होते. या शाळेत ४५० गोळ्या आरोग्य विभागाने वितरणासाठी दिल्या होत्या. इयत्ता ११ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना गोळ्या वितरित करत असतांना काही गोळ्या बुरशीयुक्त आढळल्या. यानंतर मुख्याध्यापकांनी गोळ्यांचे वितरण तातडीने थांबवले. ७ विद्यार्थ्यांना गोळ्या देण्यात आल्या होत्या. या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्यात आली.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी !