परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन सत्संगा’तून केरळ येथील साधिका आणि जिज्ञासू यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
९.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगात त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना साधिका, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. साधिका
१ अ. सौ. प्रेमा कुमारन्
१. हा संपूर्ण कार्यक्रम पहातांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
२. सत्संग ऐकल्यावर एक साधिका म्हणाली, ‘‘मी माझे कपडे धुतांना ‘ते परात्पर गुरुदेवांचे आहेत’, असा भाव ठेवते. यापुढे मी यजमान आणि सासूबाई यांचे कपडे धुतांनाही असाच भाव ठेवीन.’’
२. जिज्ञासू
२ अ. सौ. नीना उदयकुमार : ‘प.पू. गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे मला पुष्कळ वेळ वाटत होते. मला ‘प.पू. गुरुदेवांनी पांढरा सदरा घातला आहे’, असे दिसत होते.’
२ आ. श्री. प्रकाश प्रभु : ‘सत्संगातून मला प.पू. गुरुदेवांची प्रीती प्रकर्षाने जाणवली. मला व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे महत्त्व समजले, तसेच इतरांच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी स्फूर्ती मिळाली.’
३. धर्मप्रेमी
३ अ. श्री. राकेश नेल्लिथाया : ‘माझ्या मनातील शंका न विचारताच सत्संगातून मला त्यांची उत्तरे मिळाली.’
(लिखाणातील सर्व सूत्रांचा दिनांक : २६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |