पाकमधील मदरशांद्वारे भारतात आतंकवादी कारवाया ! – अमेरिकेच्या संस्थेचा अहवाल
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये सध्या ४० सहस्र मदरशांतून आतंकवादी निर्माण होत आहेत. हे आतंकवादी भारतात आतंकवादी कारवाया करतात. पाकचे काश्मीरविषयीचे धोरण पाकच्या सैन्याच्या नियंत्रणात आले. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये कोणताही तज्ञ आतंकवाद समाप्त करण्याच्या संदर्भात काहीही बोलू शकत नाही, असा अहवाल अमेरिकेतील ‘बाल्टीमोर पोस्ट एग्झामिनर’ या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
पाकिस्तानी मदरसे भारत में फैला रहे आतंक, बाल्टीमोर पोस्ट एग्जामिनर की रिपोर्ट में दावा#PakistaniMadarsa #Terrorism #BaltimorePostExaminerhttps://t.co/YRVDHJeOnq
— Amar Ujala Videos (@AmarUjalaVideos) April 26, 2022
या अहवालात म्हटले आहे की,
१. पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाक सैन्याला खुश करण्यासाठी ‘आम्ही भारताशी चांगले संबंध ठेऊ इच्छितो; मात्र काश्मीर प्रश्न सोडवल्याविना ते शक्य नाही’, असे म्हटले होते.
२. पाकिस्तान कृषी आधारित देश आहे. पाकला शेतीसाठी आवश्यक दोन तृतीयांश पाणी काश्मीरमधील नद्यांमधून येत असते. तरीही या संदर्भातील दोन्ही देशांमधील कराराचे पालन करण्याऐवजी पाकने काश्मीरवर नियंत्रण मिळवण्याचे धोरण राबवले आहे.
३. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानला गिलगिट आणि अन्य भागातून मागे जाण्यासाठी सांगितले होते; मात्र पाकने ते एकलेले नाही.
४. वर्ष १९५६ नंतर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धार्मिक आणि वंश संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न चालू केला.
५. पाकिस्तानचा सध्या एकमेव सहकारी चीन आहे. चीनला वाटते की, भारत काश्मीरच्या सूत्रावर व्यस्त रहावा आणि त्याचे लक्ष तिबेट अन् शिनजियांग येथील कारवायांकडे दुर्लक्ष व्हावे.
संपादकीय भूमिका
|