हलाल प्रमाणपत्र हे हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
रांची (झारखंड) – हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण आहे. इस्लामी अर्थव्यवस्था अर्थात् हलाल अर्थव्यवस्थेला अतिशय चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रांची येथील माहेश्वरी समाजासमवेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या बैठकीचे आयोजन स्थानिक माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्री. शिवशंकर साबू आणि श्री. राजकुमार मारू यांनी केले.
🚩 रांची (झारखंड) : हिन्दू जनजागृति समिति द्वारा महेश्वरी समाज के साथ ‘Halal Economy’ के विषय में जागृति बैठक का आयोजन !
'हलाल सर्टिफिकेट हिन्दुओं के संवैधानिक अधिकारोंपर आक्रमण है ।' – @Shambhu_HJS
सम्मिलित उद्योजकों का दृढ संकल्प – #BoycottHalalProducts pic.twitter.com/Nvwgj6d62Y
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) April 24, 2022
बैठकीला अनेक उद्योजक उपस्थित होते. ‘हलाल प्रमाणपत्राच्या संदर्भात माहेश्वरी समाजाच्या सर्व लोकांमध्ये जागृती व्हावी’, यासाठी समाजाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले आहे.