आश्रमात लावलेली बासरीची धून ऐकतांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) महानंदा पाटील यांना आलेल्या अनुभूती
१. आश्रमात बासरीची धून लावल्यावर कधी रामाकडून, तर कधी बासरीच्या नादातून चैतन्य मिळणे
‘२०.२.२०२० या दिवशी सकाळी १० वाजता आश्रमातील ध्वनीक्षेपकावर बासरीची धून लावली होती. त्या नादातून मला आनंद मिळत होता. तेव्हा मला विरहाचे दुःखही होते; कारण माझा राम स्थुलातून माझ्यापासून पुष्कळ दूर होता. ‘मी त्याला कधी आणि कशी भेटीन ?’, असे मला वाटू लागले. आश्रमात बासरीची धून लावल्यावर मला कधी रामाकडून, तर कधी बासरीच्या नादातून चैतन्य मिळत होते. त्या वेळी मी रामाच्या अनुसंधानात होते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्यात झालेले बासरीवादन ऐकल्यापासून आश्रमात बासरीची धून लावल्यावर पुष्कळ आनंद होणे
पूर्वी बासरीची धून लावल्यावर मला काही वाटत नव्हते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा श्रीविष्णुतत्त्व जागृती सोहळ्यात झालेले बासरीवादन मी ऐकले होते. तेव्हापासून आश्रमात लावत असलेली बासरीची धून मला आवडू लागली. आता बासरीची धून लावल्यावर मला पुष्कळ आनंद होतो आणि रामाची आठवण येऊन चैतन्य मिळते.’
– सुश्री (कु.) महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.३.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |