हिंदु राष्ट्र स्थापनेतील खारीचा वाटा आपल्याला उचलायचा आहे ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

असगणी (ता. खेड) येथे ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा

खेड, २५ एप्रिल (वार्ता.) – जगातील १५२ ख्रिस्ती राष्ट्रे ‘बायबल’चा आदर्श मानतात, ५३ इस्लामी राष्ट्रे ‘कुराण’चा आदर्श मानतात, तर आपला हिंदूबहुल देश मात्र हिंदु राष्ट्र म्हणून नव्हे, तर धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळेच आज बहुसंख्य हिंदूंच्या देशात नाटके, विज्ञापने, चित्रपट आदी माध्यमांतून आमच्या श्रद्धास्थानांचे विडंबन होते, संतांचा अवमान केला जातो. धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांचे सरकारीकरण यांसारख्या अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. या सर्व समस्यांवर एकमात्र उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा होय. हिंदु राष्ट्र स्थापनेतील आपला वाटा उचलायचा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले. श्री भैरी देवस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री भैरी मंदिरात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सरपंच श्री. अनंत मायनाक, श्री. चंद्रकांत गोसावी यांसह १२२ हिंदु धर्मप्रेमी या उपस्थित होते. सूत्रसंचालन समितीचे श्री. नितीन जाधव यांनी केले.

विशेष

१. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय असणारे परात्पर गुरु डॉक्टर आठवले, तसेच या कार्याला आध्यात्मिक बळ पुरवणारे संत, महंत यांना आयुरारोग्य लाभावे, यासाठी ग्रामदैवत श्री भैरी मंदिराच्या चरणी ग्रामस्थांनी साकडे घातले.

२. सभेचा प्रसार, निमंत्रण आणि सिद्धता गावातील धर्मप्रेमींनी केली.

अभिप्राय

१. श्री. विठ्ठल गणपत नायनाक, आदिनाथ संप्रदाय, असगणी : सरकारीकरण झालेल्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांना देतात, ही घोडचूक आहे. यातून हिंदूंनाच लुबाडले जात आहे. हिंदु अन्य पंथांचे पालन करतात, हेही चुकीचे आहे.

२. श्री. प्रमोद चांदिवडे, शिक्षक : सभेच्या माध्यमातून धर्माचे ज्ञान मिळते, ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे.

३. श्री. सुजित बुरटे : अशा सभा ही काळाची आवश्यकता आहे.

४. श्री. अनिल गीते : सभेतून धर्मशिक्षण घेणे का आवश्यक आहे, हे लक्षात आले.