सातारा तालुक्यातील एका गावात ११ वर्षीय मुलीवर अत्याचार !
सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – तालुक्यातील एका गावात ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने २० वर्षीय युवकाला अटक केली आहे. याविषयी पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल म्हणाले, ‘‘या घटनेविषयी आरोपीविरोधात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडितेच्या वैद्यकीय पडताळणीनंतर आणखी काही कलमे वाढवावी लागल्यास ती वाढवली जाणार आहेत. सध्या घायाळ अवस्थेतील मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.’’
संपादकीय भूमिकाअसुरक्षित सातारा ! आरोपीला पकडून त्याला त्वरित आणि कठोर शिक्षा द्यायला हवी. |