‘स्वतःचा वाढदिवस म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच वाढदिवस आहे’, असे वाटून निर्विचार अवस्था अनुभवणारी कु. श्रिया राजंदेकर !
‘स्वतःचा वाढदिवस म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच वाढदिवस आहे’, असे वाटून निर्विचार अवस्था अनुभवणारी फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रिया राजंदेकर ही या पिढीतील एक आहे !
फोंडा, गोवा येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असणारी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे) हिचा आज चैत्र कृष्ण एकादशी (२६.४.२०२२) या दिवशी ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. श्रियाला वाढदिवसानिमित्त जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
कु. श्रिया राजंदेकर हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
‘असे विचार अनेक वर्षे साधना केलेल्या साधकांच्या मनात येणार नाहीत. या विचारांबद्दल कु. श्रियाचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.४.२०२२) |
१. पूर्वी स्वतःच्या वाढदिवसाची वाट पहात रहाणे
‘चैत्र कृष्ण एकादशी (वरुथिनी एकादशी) २६.४.२०२२ या दिवशी माझा तिथीनुसार वाढदिवस आहे. याआधी मला वाढदिवसाच्या दिवशी ‘हा माझा, म्हणजे श्रियाचा वाढदिवस आहे’, असे वाटायचे. त्यामुळे मी माझ्या वाढदिवसाची वाट पहात असायचे.
२. ‘या वर्षी हा वाढदिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच आहे’, असे वाटणे आणि त्या वेळी मन निर्विचार होऊन ‘गुरुदेवांच्या चरणी लीन व्हावे’, असे वाटणे
या वेळी ‘मला हा वाढदिवस परात्पर गुरु डॉक्टरांचाच आहे आणि त्यात माझे काही नाही’, असे वाटते. तसेच मी ‘हा परात्पर गुरु डॉक्टर यांचाच वाढदिवस आहे’, असे म्हणते. तेव्हा माझे मन निर्विचार होते आणि मला ‘परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी लीन व्हावे’, असे वाटते. हा भाव माझ्या मनात आपोआपच निर्माण झाला आहे. त्यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत.
परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ही अनुभूती दिली आणि ती माझ्याकडून लिहूनही घेतली. तसेच त्यांनी मला या अनुभूतीच्या माध्यमातून ‘अनुभूती कशी अनुभवायची ?’, हे शिकवले, त्याबद्दल त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता !’
– गुरुदेवांच्या चरणांवरील छोटेसे फूल,
कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे), फोंडा, गोवा.(१६.४.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |