अस्तित्व संपणार या भीतीने बेताल वक्तव्य ! – श्रीधर पाटील, सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा, कागल तालुका
कागल (जिल्हा कोल्हापूर), २३ एप्रिल (वार्ता.) – कागलमध्ये झालेल्या हसन मुश्रीफ यांच्या मिरवणुकीत त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्याचे नेते समरजीतसिंह घाटगे यांचा एकेरी उल्लेख केला. त्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने आम्ही निषेध करतो. समरजीतसिंह घाटगे यांनी त्यांच्या कामातून त्यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे कागलच्या जनतेने त्यांना अपक्ष उमेदवारी असतांनाही भरघोस मते दिलीत. परिणामी आपले अस्तित्व संपणार या भीतीने विरोधकांकडून बेताल वक्तव्ये केली जात आहेत, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाच्या कागल तालुक्याचे सरचिटणीस श्री. श्रीधर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, अशी वक्तव्ये करण्यापेक्षा शेतकर्यांना अनुदान का मिळत नाही ? वीज भारनियमन, तसेच जनतेच्या प्रश्नांवर बोलावे. यापुढील काळात अशी वक्तव्ये करणे बंद न केल्यास जनता तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही.