ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधाकडून हिंदु तरुणीशी विवाह करून धर्मांतर

धर्मांतर करून देणार्‍या मौलाना आणि २ दिरांकडून तरुणीवर बलात्कार

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथील डबरा तालुक्यातील जंगपुरा गावामध्ये धर्मांध तरुणाने हिंदु नाव धारण करून एका २६ वर्षीय हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी मंदिरात जाऊन विवाह केला. काही काळानंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यास दबाव आणण्यात आला. त्या कालावधीत धर्मांतर करणार्‍या मौलानाने (इस्लामी विद्वानाने) बलात्कार केला. विवाहानंतर धर्मांधाने या तरुणीला ६ मास घरातच डांबून ठेवले होते. या काळात त्याच्या २ भावांनी आणि अन्य दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. धर्मांधाच्या घरातून पलायन करून ती स्वतःच्या घरी पोचली आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पती इम्रान उपाख्य राजू, त्याची आई सुग्गा बेगम यांना अटक केली आहे, तर इम्रानचे भाऊ अमन आणि पुन्नी पसार आहेत.

पीडित तरुणीने सांगितले, ‘जानेवारी २०२१ मध्ये माझी इम्रान याच्याशी ओळख झाली होती. त्याने त्याचे नाव राजू असे सांगितले होते. तो मला डबरा येथे घेऊन गेला. तेथे त्याने शीतपेयामध्ये गुंगीचे ओषध टाकून माझ्यावर बलात्कार केला. यामुळे मी गर्भवती झाली. !विवाहापूर्वी मूल झाल्याने अपकीर्ती होईल’, या भीतीने माझा गर्भपात करण्यात आला.’

संपादकीय भूमिका 

  • अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !