बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील एचडीएफसी बँकेत नमाजपठण आणि इफ्तार
संबंधितांवर कारवाई करा अन्यथा बँकेत हनुमान चालिसाचे पठण करू ! – बजरंग दलाची पोलिसांना चेतावणी
बाराबंकी (उत्तरप्रदेश) – येथील पैसार भागातील एचडीएफसी बँकेमध्ये नमाजपठण आणि इफ्तार आयोजित करण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर याचा विरोध केला जात आहे. याविषयी बँक आणि पोलीस दोघेही काहीही बोलण्यास नकार देत आहेत.
‘शबाब मिलता है’: मैनेजर जहीर ने HDFC बैंक में कराया नमाज और रोजा-इफ्तारी, सपा नेता ओसामा भी हुए शामिल, बोले हिन्दू संगठन – ‘गजवा-ए-हिन्द’#HDFCBank #Barabanki@STVRahul की रिपोर्ट।https://t.co/n4dandP0YD
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 25, 2022
या प्रकरणी बजरंग दलाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच जर कारवाई झाली नाही, तर बँकेमध्ये हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली आहे. बँकेचे व्यवस्थापक झहीर अब्बास यांनी बँकेचे कामकाज संपल्यानंतर येथे इफ्तारचे आयोजन केले होते.